My360 Helper


या भागामध्ये: देव, सहभागिता, देवाचे प्रतिरूप एक मार्ग ज्यामध्ये आपण देवासारखे आहोत! देव अनेक प्रकारे आपल्यापेक्षा वेगळा आहे. आपण खचून जातो आणि निराश होतो, पण देव कधीच थकत नाही आणि त्याला वेळेचे बंधन नसते. जसजसे आपण वाढतो आणि बदलतो, देव परीपूर्ण आणि अपरिवर्तित आहे. त्याच्या प्रतिरुपात बनवलेले असले तरी आपल्यात त्या परिपूर्णतेचा अभाव आहे. एक सामायिक वैशिष्ट्य म्हणजे उत्कट इच्छा - देवाला त्याच्या निर्मितीसह सहभागिता हवी आहे, म्हणूनच तो आदाम आणि हव्वासोबत चालला. आपण देखील आपल्या निर्मात्यासोबतच्या आपल्या नात्यातून पूर्ण होण्यास उत्सुक आहोत.