पवित्र शास्त्र कसे वाचावे: नियम
12पवित्र शास्त्र कसे वाचावे: संदेष्टे
#BibleProject #मत्तय #संदेष्टे
पवित्र शास्त्र कसे वाचावे: स्तोत्रांचे पुस्तक
स्तोत्रसंहीतेचे पुस्तक पवित्र शास्त्रातील कवितांचा सर्वात मोठा संग्रह आहे. या व्हिडिओमध्ये आपण, सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचण्यासाठी तयार केलेल्या या अद्भुत पुस्तकाची रचना, आकार आणि मुख्य विषयांचा परीक्षण करू. स्तोत्रे जणू काय एका साहित्यिक मंदिरात आमंत्रीत करतात, जिथे आपण देवाला भेटू शकतो आणि संपूर्ण पवित्र शास्त्रातील कथा कवितेच्या रूपात परत ऐकू शकतो. #BibleProject #मत्तय #स्तोत्रांचेपुस्तक
पवित्र शास्त्र कसे वाचावे: पार्शवभूमी
प्रत्येक कथा कुठेतरी घडली पाहिजे आणि बर्याचदा स्थानांचा, त्या ठिकाणी पुर्वी घडलेल्या घटनांमुळे विशिष्ट अर्थ किंवा महत्त्व दिसून येते. या व्हिडिओमध्ये आम्ही पवित्र शास्त्राचे लेखक वाचकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी किंवा त्यांना गोंधळात टाकण्यासाठी कथानकातील पार्शवभूमीचा कशा प्रकारे वापर करतात यांचा शोध करणार आहोत. पवित्र शास्त्रातील कथांमध्ये स्थान आणि कालानुक्रमेकडे लक्ष दिल्याने अर्थपूर्णतेचा गहन थर उकलतो. #BibleProject #मत्तय #पार्शवभूमी
पवित्र शास्त्र कसे वाचावे: पात्र
आपल्यापैकी बर्याचजणांच्या मनात पवित्र शास्त्रमधील पात्र पापी किंवा संत आहेत, चांगले किंवा वाईट आहेत असे विचार असतात. किमान अशाच प्रकारे पवित्र शास्त्रातील कथा मुलांना सादर केल्या जातात. या व्हिडिओमध्ये, पवित्र शास्त्राचे लेखक पात्रांना आपल्या कलपणेपेक्षा अधिक जटिल आणि नैतिक तडजोड करणारे म्हणून कसे सादर करतात ते शोधून काढू. #BibleProject #मत्तय #पात्र
पवित्र शास्त्र कसे वाचावे: कथानक
पवित्र शास्त्रातले वृतांत वाचण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे "कथानकाचे" स्वरूप समजून घेणे आणि संघर्ष व निराकरण याची रचणा कथे मध्ये कशा पद्धतीने केली आहे हे शिकणे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कसं कथानकाच्या अनुक्रमाकडे दुर्लक्ष केल्यामूळे पवित्र शास्त्रातल्या कथांचे विकृत अर्थ लावले जाऊ शकतात. आपण याचे पण अन्वेषण करणार आहोत की पवित्र शास्त्रातल्या वृतांताचे बहुस्तरीय आकलन केल्यामुळे आपणास येशूकडे नेणारी एकीकृत कथा पाहण्यास कशी मदत होऊ शकते. #BibleProject #मत्तय #कथानक
पवित्र शास्त्र कसे वाचावे: प्राचीन यहुदी ध्यान-साहित्य
सूज्ञ पणे पवित्र शास्त्राचे वाचन करण्यासाठी आपण पवित्र शास्त्राच्या लेखकांनी वापरलेल्या पुरातन साहित्यिक शैलीविषयी शिकले पाहिजे. पवित्र शास्त्र हे एक गहन पुस्तक आहे आणि बऱ्याचदा ते वाचणे कठीण होते. परंतु त्यास आव्हानात्मक बनविणारी वैशिष्ट्येच जर खरोखरच आयुष्यभर ध्यान करण्याची आमंत्रणे असतील तर काय? या व्हिडिओमध्ये, पवित्र शास्त्र हे मूळ ध्यान साहित्य कसे आहे हे आपण पाहणार आहोत. #BibleProject #मत्तय #प्राचीनयहुदीध्यान-साहित्य
पवित्र शास्त्र कसे वाचावे: पवित्र शास्त्र म्हणजे काय?
पवित्र शास्त्राचा उगम, विषय, आणि हेतू शोधून काढणार्या चालू मालिकेचा हा भाग 1 आहे. येथे आपणास पवित्र शास्त्र प्रभावीपणे वाचण्यासाठी आवश्यक असलेल्या काही मूलभूत कौशल्यांची ओळख करुन दिली जाईल. #BibleProject #मत्तय #पवित्रशास्त्रम्हणजेकाय
विहंगावलोकन: १-२ इतिहास
१-२ इतिहास वरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होतो. इतिहासाच्या पुस्तकातून संपूर्ण जुन्या कराराची कथा पुन्हा सांगितली जाते व त्यातिल चित्तवेधक गोष्ट म्हणजे मशीहा राजा आणि पुनर्स्थापित होणाऱ्या मंदिराची भविष्यातील आशा होय. #BibleProject #मत्तय #इतिहास
विहंगावलोकन: दानिएल
दानीएल वरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा, त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. बॅबिलोनमध्ये बंदिवासात असतानाही दानीएलची कथा विश्वासू राहण्याची प्रेरणा देते. देव सर्व जगाला त्याच्या अधिपत्याखाली आणील अशी आशा त्याला झालेल्या दृष्टांतांमधून प्राप्त होते. #BibleProject #मत्तय #दानिएल
विहंगावलोकन: एस्तेर
एस्तेर वरील आमचा विहंगावलोकन व्हिडिओ पहा,त्यात या पुस्तकाची साहित्यिक रचना आणि त्यातिल विचार प्रवाहाची फोड व मांडणी प्रदर्शित होते. एस्तेरमध्ये, देव तरतुदीने बंदीवासातील दोन इस्राएली लोकांचा उपयोग त्याचा लोकांना निश्चित विनाशा पासून वाचवण्यासाठी करतो आणि ते ही देवाचा किंवा त्याच्या कार्याचा स्पष्टपणे उल्लेख न करता. #BibleProject #मत्तय #एस्तेर